क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्या वतीने १ सहस्र लोकांना अर्सेनिक अल्ब ३० गोळ्यांचे वाटप

कोल्हापूर – क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्या ८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करून १ सहस्र लोकांना अर्सेनिक अल्ब ३० या रोगप्रतिकारक गोळ्या आणि मास्क यांचे वितरण करण्यात आले. फौंडेशनच्या वतीने पावसाळ्यात २०० झाडे लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.