हार उचलण्यासाठी घेण्यात आले जेसीबीचे साहाय्य

बीड – येथे छत्रपती संभाजी राजे यांचे २५१ किलो वजनाच्या फुलांच्या हाराने स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे हा हार उचलण्यासाठी जेसीबीचे साहाय्य घेण्यात आले होते, तसेच या वेळी १५० किलो वजनाच्या फुलांची उधळणही करण्यात आली. यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी राजे यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी संभाजी राजेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या बीड दौर्यावर आहेत. (जनता नेहमी लोकप्रतिनिधींचा अनुयय करते, तसेच सध्याच्या कोरोनाच्या काळात सवंग लोकप्रियतेच्या गोष्टी टाळून समाजभान राखणे अत्यावश्यक आहे ! – संपादक)
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !