भूमी अपहार प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे यांची पत्नी कह्यात

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – भूमीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बर्‍हाटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ते सध्या पसार असून त्यांना साहाय्य केल्याप्रकरणी त्यांच्या पत्नी संगीता बर्‍हाटे यांना गुन्हे शाखेच्या पथकाने कह्यात घेतले. या गुन्ह्यात रवींद्र बर्‍हाटे आणि देवेंद्र जैन यांच्यासह १३ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी सचिन धिवार यांचा भाऊ पितांबर धिवार यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. बर्‍हाटे पसार झाल्यापासून ते पितांबर धिवार यांच्या संपर्कात असल्याचे, तसेच गुन्ह्यात साहाय्य केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ही कारवाई केली.