मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये रेल्वेसेवा काही काळ ठप्प
पाऊस अल्प झाल्यावर मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली. १६ जुलैला सायंकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाला प्रारंभ झाला होता.
पाऊस अल्प झाल्यावर मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक चालू करण्यात आली. १६ जुलैला सायंकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाला प्रारंभ झाला होता.
दळणवळण बंदीमुळे मार्च २०२० पासून बंद असलेली कोल्हापूर-कर्णावती (गुजरात) रेल्वे अखेर १० मार्चपासून चालू झाली आहे. ही रेल्वे बंद असल्याने सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक अशा सर्वच वर्गाला त्याचा फटका बसत होता.
जेव्हा कधी राज्यशासनाला वाटेल की, कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे, रेल्वे सेवा चालू करायला हवी, तेव्हा राज्याने केंद्राला प्रस्ताव पाठवावा. त्यावर अभ्यास करून लोकल सेवा चालू करू.
बिहारच्या दरभंगा रेल्वे स्थानकामध्ये १७ जून या दिवशी पार्सल बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने लष्कर-ए-तोयबाच्या इम्रान मलिक आणि महंमद नासीर या दोघा आतंकवाद्यांना अटक केली आहे.
डेल्टा प्लस व्हायरसचा धोका आणि तिसरी लाट थोपवण्यासाठी लोकलमध्ये गर्दी अल्प करण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.
कोरोना संपेपर्यंत मुंबईतील लोकल रेल्वे चालू होणार नाही, असे वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. मुंबईतील लोकल रेल्वे कधीपासून चालू होणार ? याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता वडेट्टीवार यांनी वरील वक्तव्य केले.
कोल्हापूर ते सोलापूर जाणार्या अनेक गाड्या कोरोनामुळे १ वर्षाहून अधिक काळ बंद आहे. यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरला जाऊन विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणार्या भाविकांना सध्या कोणताच पर्याय उपलब्ध नाही.
रेल्वेतून प्रवास करणार्या नागरिकांना आता ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीचा अहवाल दाखवण्याऐवजी ‘कोरोना प्रतिबंधात्मक लस’ घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारचा नियम करण्याचा रेल्वेकडून विचार चालू आहे.
घरी परतणार्या नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दुपारी ३ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेस्थानकावर ताटकळत उभे रहावे लागले, तर रस्ते वाहतुकीने घरी जाणारे नागरिक वाहतूककोंडीमुळे ५-६ घंटे रस्त्यांवर अडकून पडले.
पहिल्याच पावसामुळे मुंबईची झाली दूरवस्था ! रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेस्थानकांवर कर्मचार्यांचा खोळंबा, शीव रेल्वेस्थानकाला तलावाचे स्वरूप !