परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना जिज्ञासा नसल्याने ते स्वतःला आहे तेवढ्या छोट्याशा ज्ञानात (अज्ञानात) रहातात. त्यांना पुढचे पुढचे काहीच कळत नाही.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना सृष्टीची उत्पत्ती, विश्‍वाची रचना, सप्तलोक, सप्तपाताळ, मंत्रशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादींच्या संदर्भात कळले, ते आधुनिक वैज्ञानिकांना अजूनही कणभरही कळत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शारीरिक आणि मानसिक बळांपेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ असूनही हिंदू साधना विसरल्यामुळे चिमूटभर धर्मांध आणि इंग्रज यांनी काही वर्षांतच संपूर्ण भारतावर राज्य केले ! आता तसे पुन्हा होऊ नये; म्हणून हिंदूंनी साधना करणे अतिशय आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प्रत्येक पिढीचे कर्तव्य !

‘प्रत्येक पिढी पुढील पिढीकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात अपेक्षेने पाहते. याऐवजी प्रत्येक पिढीने ‘आम्हाला काय करता येईल ?’, असा विचार करून असे कार्य केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यांसंदर्भात काही करण्याची आवश्यकता न उरल्याने ती सर्व वेळ साधनेला देऊ शकेल !’  – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सच्चिदानंद ईश्‍वराची प्राप्ती कशी करायची, हे अध्यात्मशास्त्र सांगते, तर ‘ईश्‍वर नाहीच’, असे काही  विज्ञानवादी, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी ओरडून सांगतात !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्‍वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले