धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रातील कायदे !
हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.
हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !
‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे इत्यादी विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो. हिंदूंनी धर्माचे महत्त्व आतातरी लक्षात घेऊन सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.’
‘धर्मशिक्षणामुळे धर्मासाठी त्याग करण्यास लाखो मुसलमान सिद्ध असतात, तर हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते बुद्धीप्रामाण्यवादी होऊन धर्माला खोटे ठरवतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्या जनतेला राष्ट्र अन् धर्म यांच्याविषयी प्रेम नसणार्या राजकीय पक्षांना निवडून द्यायचा अधिकार दिल्याने देशाची सर्वच क्षेत्रांत केविलवाणी स्थिती झाली आहे !
‘सनातन प्रभातमधील ३० टक्के मजकूर साधनेसंदर्भातील असल्यामुळे वाचकांना अध्यात्माची ओळख होते आणि काही जण साधना करण्यास आरंभ करून जीवनाचे सार्थक करतात.
‘जो जिवंत असतांना आनंदावस्था अनुभवत असतो, तो मेल्यावर तीच अनुभवत असतो. त्यामुळे मृत्यूनंतर एका खोलीतून दुसर्या खोलीत जातो, तेवढेच त्याला वाटते.’ यावरून साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सुखोपभोग आणि सुख-समाधान यात फरक आहे. सुख-समाधान हा परमेश्वरी संकेत आहे, तर सुखोपभोग हा दानव संकेत आहे.’
अमूल्य आणि दुर्लभ मनुष्यजन्माचे महत्त्व लक्षात न घेता क्षुल्लक कारणास्तव जीव देत आहेत. ही अतिशय निंदनीय गोष्ट असून त्याच्यासारखे पाप कर्म नाही. ब्रह्महत्येला महापातक म्हटले आहे.