हे सरकारला कळत कसे नाही ?
‘फटाके वाजवू नका’, असे कोट्यवधी लोकांना सांगण्यापेक्षा कायदा करून ‘फटाके विकू नका, फटाके बनवू नका’, असे सांगणे सुलभ आहे. हे सरकारला कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘फटाके वाजवू नका’, असे कोट्यवधी लोकांना सांगण्यापेक्षा कायदा करून ‘फटाके विकू नका, फटाके बनवू नका’, असे सांगणे सुलभ आहे. हे सरकारला कळत कसे नाही ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
संसारात राहून साधना करणार्यांना घरातील माणसांपासून विरक्ती येण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज असे करायला सांगायचे.’
‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘आपण आईचे दूध पितो, त्याप्रमाणे गायीचे दूध पितो; म्हणून गायीला गोमाता म्हणतात. असे असतांना गायीचीच हत्या करणे, हे आईची हत्या करण्यासारखेच झाले. ही कृतघ्नपणाची परिसीमा होय !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘चूक झाल्यास सर्वसाधारण व्यक्तीही क्षमा मागते; पण असंख्य चुका करणारे पोलीस, प्रशासनातील व्यक्ती आणि राजकारणी एकदा तरी क्षमा मागतात का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यवहारात पैसे मिळाले की, व्यक्ती ते स्वतःकडे ठेवते; मात्र अध्यात्मात ईश्वराचे प्रेम मिळाले की, संत ते सर्वांना वाटतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या भक्तीची गोडी निर्माण केली असती, तर कुणी दारू अन् सिगारेट यांच्या नशेला बळी पडला नसता !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘ज्या आई-वडिलांनी जन्म दिला आणि लहानाचे मोठे केले, त्यांची काळजी त्यांच्या म्हातारपणात हल्लीचे बरेच कृतघ्न तरुण घेत नाहीत. आई-वडिलांची काळजी न घेणारे देवाचे काही करतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मविरोधी आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खासगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले