परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्‍वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्‍वरप्राप्ती लवकर होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कुठे काही वर्षांतच विसरले जाणारे मायेतील विषय, तर कुठे युगानुयुगे अभ्यासले जाणारे अध्यात्मातील ग्रंथ !

‘मायेतील विषय लवकर विसरले जातात. त्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्धच नाही, तर नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ यांचीही नावे २५ ते ५० वर्षांत कुणाला ज्ञात नसतात. याउलट अध्यात्मातील इतिहास आणि ग्रंथ युगानुयुगे मानवाला ज्ञात असतात; कारण ते मार्गदर्शन करतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सात्त्विक व्यक्तींच्या व्यष्टी जीवनाचे ध्येय असते ईश्‍वरप्राप्ती, तर समष्टी जीवनाचे ध्येय असते रामराज्य !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘प्रवचने, व्याख्याने आणि चालू विषयावरील ग्रंथ-लिखाण यांत ज्यांचे जीवन जाते, त्यांचे नाव आणि कार्य ते जिवंत असेपर्यंत असते. याउलट जे संशोधन करतात त्यांचे नाव आणि कार्य पुढच्या अनेक पिढ्यांना ज्ञात होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

 ‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

भगवंताच्या समष्टी कार्याचे महत्त्व

‘एकेका भक्ताला साहाय्य करणार्‍या देवापेक्षा समष्टीला साहाय्य करणारे देवाचे राम-कृष्णादी अवतार सर्वांना जवळचे वाटतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर धर्म, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्‍वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले