मानखुर्द (मुंबई) येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा त्वरित काढा ! – विश्‍व हिंदु परिषदेची राज्यपालांकडे मागणी

न्यायालयाच्या निर्देशानुसार मानखुर्द येथील मशिदीवरील अनधिकृत भोंगा काढण्याऐवजी पोलिसांनी कु. करिश्मा भोसले यांच्या आईला भा.द.वि.च्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावली.

‘पाताल लोक’ वेबसीरिजच्या निर्मात्या अनुष्का शर्मा यांच्या विरोधात भाजपच्या उत्तरप्रदेशमधील आमदाराची तक्रार

भाजपच्या आमदाराला तक्रार का करावी लागते ? वास्तविक सरकारनेच हिंदूंचा द्वेष करणार्‍या अशा मालिकांवर बंदी घातली पाहिजे !

अपघातामुळे कोमामध्ये गेलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना ७५ लाख रुपये देण्याचा देहली उच्च न्यायालयाचा देहली पोलिसांना आदेश

वर्ष २०१५ मध्ये देहली पोलिसांनी पंजाबी बाग येथे लावलेल्या बॅरिकेडमुळे (अडथळ्यामुळे) रात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघात धीरज नावाचा एक तरुण कोमामध्ये गेला होता. या प्रकरणी देहली उच्च न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला होता.

बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणार्‍या बसचालकवर गुन्हा नोंद

बेस्ट बसमधून मद्याची वाहतूक करणारा बसचालक निजाम होडकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नालासोपारा पूर्वेला हा प्रकार घडला असून या बसमधून ३० सहस्र रुपयांचे देशी-विदेशी मद्य कह्यात घेतले आहे.

‘रेड झोन’मध्ये आंब्यांची विक्री करून येणारे चालक आणि त्यांचे सहकारी यांना वेगळे ठेवण्यात येणार

कोरोनाचा संसर्ग असलेल्या अतीसंवेदनशील क्षेत्रामध्ये (रेड झोनमध्ये) आंबा विक्री करून येणारे वाहनचालक आणि त्यांचे सहकारी यांना गोदामात किंवा अन्य वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून पोलीस आणि वैद्यकीय पथक यांच्यावर आक्रमण

पोलीस आणखी किती दिवस धर्मांधांकडून असे मार खात रहाणार आहेत ? देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या असतांना त्यातून काहीही न शिकणार्‍या पोलिसांना धर्मांधांकडून मार खाणे आवडते, असे समजायचे का ?

सामाजिक माध्यमांद्वारे खोट्या लिंक प्रसारित, नागरिकांनी सावध रहावे ! – नवी मुंबई पोलीस

दळणवळण बंदीमुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा अपलाभ घेत काही समाजकंटकांनी खोट्या लिंक संकेतस्थळ, व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य प्रसारमाध्यमे यांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित करणे चालू केले आहे.

वसईत पोलिसांवर आक्रमण करणार्‍या दोघांना अटक

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच पोलिसांवर आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत !

नाशिक येथे विनाकारण दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांसाठी दुचाकी जप्त होणार

दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वारंवार सांगूनही दुचाकींचा वापर सर्रास चालूच असल्यामुळे आता विनाकारण कोणी दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांकरिता दुचाकी जप्त होणार आहे.

शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पोलिसांना चहापान

जिवाचे रान करून सेवा बजावणार्‍या उचगाव फाटा, उचगाव ‘हायवे ब्रीज’, तावडे हॉटेल चौक परिसरातील कामावर असणार्‍या पोलिसांना, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चहापान देण्यात आले.