अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते !

धर्म टिकवण्याचे स्वातंत्र्य असणारे काश्मिरी हिंदू आणि त्यांच्या सुरक्षेचे शासनावरील दायित्व

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी तेथील साडेचार लक्ष हिंदू निर्वासित झाले. आज तेच सगळे हिंदू ‘पनून कश्मीर’च्या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी लढत आहेत.