अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथील प्रसिद्ध बरघशिखा भवानी मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

  • काश्मीर अद्यापही हिंदूंसाठी आणि त्यांच्या धार्मिक स्थळांसाठी असुरक्षित आहे, हेच यातून स्पष्ट होते ! आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते काश्मीरमधील हिंदूंचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण करू शकले नाहीत, ही गोष्ट हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य करते ! – संपादक
  • जम्मू-काश्मीरमध्ये केंद्रातील भाजप सरकारचे नियंत्रण असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – – संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथील मट्टन भागामधील बरघशिखा भवानी मंदिरावर अज्ञातांनी आक्रमण करून तोडफोड केल्याची घटना २ ऑक्टोबरला दुपारी घडली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एका विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

१. पोलीस उपायुक्त पियूष सिंगला यांनी सांगितले की, येथील सामाजिक आणि धार्मिक सद्भाव टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. दोषींना दंड केला जाईल. (मुळात अशा घटना होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक)

२. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून घटनेचा निषेध केला आहे. दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

३. पीडीपीच्या नेत्या आणि माजी उपमुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही ट्वीट करत दुःख व्यक्त केले. काश्मिरी पंडितांना त्यांच्या सुरक्षेची हमी देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. (हिंदूंच्या हितांची काळजी असल्याचे नाटक करणारे उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे दोघे एका माळेतील मणी ! – संपादक)