महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी २२ ऑगस्टला होणार !

मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा १० दिवस लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता २२ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. यापूर्वी ती १२ ऑगस्ट या दिवशी होणार होती. या सुनावणीचा सर्वांत मोठा परिणाम हा राज्यातील राजकारणावर होणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्ट या दिवशी निवृत्त होणार असल्याने त्यांच्याच घटनापिठासमोर ही सुनावणी कायम रहाण्याची शक्यता आता अल्प आहे.