मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी सामाजिक माध्यमांवरून अश्लील आणि आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी प्रदीप भालेकर या माहिती अधिकार कार्यकर्त्याला ७ ऑगस्टच्या रात्री अटक केली.
भालेकर याने राज्यपालांविषयी सामाजिक माध्यमावरून आक्षेपार्ह लिखाण प्रसिद्ध केल्याचे पोलीस शिपाई अनिल वारे यांना ७ ऑगस्ट या दिवशी निदर्शनास आले. त्याने राज्यपालांच्या विरोधात ‘डिजिटल’ मोहीमही चालू केली होती. वारे यांनी सायबर पोलिसांकडे भालेकर यांची तक्रार प्रविष्ट केली. ‘राज्यपालांचा अपमान आणि अपकीर्ती करणारे लिखाण सामाजिक माध्यमावरून प्रसिद्ध करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा अन् शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न भालेकर याने केला’, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.