विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड !

अंबादास दानवे

मुंबई – विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी निवडीचे पत्र दानवे यांना दिले. शिवसेनेतील काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतरही अंबादास दानवे हे ठाकरे यांच्या समवेतच राहिले.