संभाजीनगर येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अंबादास दानवे

मुंबई, ११ सप्टेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ सप्टेंबर या दिवशी संभाजीनगर येथे सभा आहे. सभेला प्रतिसाद मिळणार नाही, हे ठाऊक असल्याने सभेला उपस्थित रहाण्यासाठी लोकांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथे केला. येथे ११ सप्टेंबर या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.