मुंबईत भरदिवसा मुलीचे अपहरण आणि बलात्कार !

मुंबई – वडाळा येथे महाविद्यालयात जातांना रस्त्यातच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आरोपी विशाल वीरकर याने तिला पुण्याला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलीने या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

संपादकीय भूमिका

देशाच्या आर्थिक राजधानीत भरदिवसा मुलींचे अपहरण होणे, म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचे कोणतेही भय राहिले नसल्याचेच लक्षण !