मॉलमधील वाईनविक्री शेतकर्‍यांच्या हिताची ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री

धान्यापासून वाईन किंवा दारू बनवण्याच्या प्रक्रियेवर बरेच बोलले जाते. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी असे प्रकल्प चालवले जातात; मात्र यामुळे  युवापिढी मद्यपी होईल, त्याचे काय ? ‘सरकारने याचाही विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा’, असेच जनतेला वाटते !

नवरात्र आणि दिवाळीत महागाई वाढण्याची चिन्हे; रुपयाचे अवमूल्यन !

येत्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबर या दिवशी शेअरबाजार चालू झाल्यावर भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले. येणार्‍या काळात एका अमेरिकी डॉलरसाठी ८०.२८ रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबईवर हक्क सांगण्याच्या भानगडीत पडू नका ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

मुंबईकरांनी २५ वर्षे विश्वास दाखवला. कसाबचे आक्रमण असा वा नैसर्गिक आपत्ती असो शिवसैनिकांनीच साहाय्य केले आहे; परंतु ज्यांना शिवसेनेने मोठे केले, ज्या सेनेने पदे दिली, त्यांनीच दगा केला, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्रातील तरुणवर्गाचे आर्थिक खच्चीकरण चालू आहे ! – आदित्य ठाकरे, शिवसेना

वर्सोवा-वांद्रे सी लिंकच्या कामामध्ये सरकारने कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टर पालटले आहेत. या कंपनीत नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन चेन्नई येथे ठेवण्यात आले.

जे.एन्.पी.टी. बंदरातून २० सहस्र किलो अमली पदार्थ जप्त !

इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यात येतो आणि सुरक्षा यंत्रणांना त्याविषयीची माहिती कशी मिळत नाही ?

रेल्वेस्थानकांत आतंकवादी शिरल्याचा दूरभाष करणार्‍या आरोपीला अडीच मासांनी अटक

एखाद्या गुन्हेगाराला शोधून काढण्यास अडीच मास लावणारे पोलीस देशांतर्गत लपून बसलेल्या शेकडो आतंकवाद्यांचा बिमोड करण्यास किती वर्षे लावणार ?

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संपूर्ण भारतभर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशक-पूर्तीनिमित्त मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसह संपूर्ण भारतभर व्यापकस्तरावर ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ राबवले जात आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आचार्य धर्मेंद्र यांना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची श्रद्धांजली !

‘जयपूर येथील रामदासी मठाचे प्रमुख पू. आचार्य धर्मेंद्रजी यांच्या स्वर्गवासाने हिंदु समाजाला नवीन दिशा देणारा प्रखर धर्माचार्य आपण गमावला आहे’, अशी भावना सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

पत्राचाळ भ्रष्टाचारातील शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध चौकशी करा !

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी !

राज्यातील ७५ नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी नदी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.