महाराष्ट्रातील तरुणवर्गाचे आर्थिक खच्चीकरण चालू आहे ! – आदित्य ठाकरे, शिवसेना

आदित्य ठाकरे

मुंबई – वर्सोवा-वांद्रे सी लिंकच्या कामामध्ये सरकारने कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टर पालटले आहेत. या कंपनीत नोकरीसाठी मुलाखतीचे आयोजन चेन्नई येथे ठेवण्यात आले. चेन्नईला मुलाखतीला जाण्याचे तिकिट सरकार काढून देणार आहे का ? यातून महाराष्ट्रातील तरुणवर्गाचे आर्थिक खच्चीकरण चालू आहे, अशी टीका शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी २१ सप्टेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

या वेळी ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी चेन्नई येथे मुलाखत का ठेवण्यात आली आहे. या आस्थापनाने महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात मुलाखत घ्यायला हवी होती. राज्य सरकारने या आस्थापनाला महाराष्ट्रात मुलाखत घेण्यास सांगायला हवे होते. ‘वेदांता-फॉक्सकॉन’, ‘बल्क ड्रग पार्क’ हे उद्योग महाराष्ट्राची पात्रता असतांना अन्य राज्यात गेले. अन्य राज्यात गुंतवणूक होतेय, याचे दु:ख नाही. सर्वत्र समान गुंतवणूक व्हायला हवी; पण आपल्या राज्यात होऊ घातलेली गुंतवणूक बाहेर गेली, याचे दुःख आहे.’’