मुंबई विमानतळावर ८ कोटी ४० लाख रुपयांचे सोने जप्त !

मुंबई विमानतळावर जप्त केलेले सोने

मुंबई – सीमाशुल्क विभागाने सोन्याची तस्करी करणार्‍याला मुंबई विमानतळावर अटक करून त्याच्याकडून १६ किलो सोने जप्त केले आहे. या सोन्याचे मूल्य ८ कोटी ४० लाख रुपये इतके आहे. १३ ऑक्टोबर या दिवशी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून आलेल्या या भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने कमरेच्या पट्ट्यात सोन्याची बिस्किटे लपवून ठेवली होती. ११ आणि १२ ऑक्टोबर या दिवशीही सीमाशुल्क विभागाने ४ वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ७ कोटी ८७ लाख रुपयांचे १५ किलो सोने जप्त केले होते. या प्रकरणांमध्ये ३ सुदान नागरिकांसह ७ जणांना अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

तस्करांचे माहेरघर झालेला भारत !