मुंबई महापालिकेच्या अभियंत्यावर गुन्हा नोंद !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! सरकारी अधिकारीच भ्रष्ट असतील, तर राज्य कधीतरी भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

गोरेगाव (मुंबई) येथे बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्‍याला अटक !

बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवणार्‍या टोळीतील एका आरोपीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. गोरेगाव परिसरातील नागरी सुविधा केंद्रावर धाड टाकून पोलिसांनी ३० हून अधिक बनावट आधारकार्ड आणि १५ बनावट पॅनकार्ड जप्त केले आहेत.

कोरियातील यूट्यूबर महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण !

कोरियातील यूट्यूबर महिलेचा खार येथे विनयभंग करणारे मोबीन शेख आणि महंमद अन्सारी यांची वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.

शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र, गोवा आणि बेळगाव (कर्नाटक) येथे ४६ ठिकाणी स्मारकाची स्वच्छता आणि पूजनाचा कार्यक्रम !

या उपक्रमाचे आयोजन हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते. ८०० हून अधिक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला.

जगदंब तलवार आणि वाघनखे वर्ष २०२४ च्या शिवराज्याभिषेकाला आणण्याचा प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवर, सांस्कृतिक कार्यमंत्री

वर्ष २०२४ मध्ये होणार्‍या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जगदंब तलवार आणि वाघनखे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तोंडावर आवर घालून सीमावादाचा प्रश्‍न चिघळू देऊ नये !

सीमावादाचा प्रश्‍न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा; पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल, तर आमचेही उत्तर तितकेच तीव्र असेल, हे विसरू नका.

घाटकोपर ‘प्रेसिडेन्शियल टॉवर’ येथे ७ डिसेंबर या दिवशी श्री दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन

या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात येणार आहे. या ठिकाणी  साधना, अध्यात्म, राष्ट्र, धर्म, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील महत्त्वाचे ग्रंथ उपलब्ध असणार आहेत.

येत्या ४८ घंट्यात महाराष्ट्र-कर्नाटकातील तणावपूर्ण वातावरण निवळेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘अशा प्रकारे राज्याराज्यांमध्ये मतभेद निर्माण होणारे वातावरण सिद्ध होणे योग्य नाही. राज्य घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे आपण कोणत्याही राज्यात जाऊ शकतो, देशात कुठेही प्रवास करू शकतो, असे आहे.

शिवरायांची वाघनखे ब्रिटनमधून आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

काही दिवसांपूर्वी लंडन येथे असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार घोषित केले आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषाभवनाची इमारत होण्यापूर्वीच जिल्ह्याजिल्ह्यांत उभी रहात आहेत ‘उर्दू घरे’ !

‘महाराष्ट्रात मातृभाषा मराठीच्या उत्कर्षासाठी सरकारने निधी व्यय करणे समजण्यासारखे आहे; परंतु तेही होतांना दिसत नाही; मात्र उर्दू भाषेसाठी सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कशासाठी व्यय करत आहे ?