जगदंब तलवार आणि वाघनखे वर्ष २०२४ च्या शिवराज्याभिषेकाला आणण्याचा प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवर, सांस्कृतिक कार्यमंत्री

सुधीर मुनगंटीवार

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा काढला, ती वाघनखे आणि जगदंब तलवार ब्रिटनमधून वर्ष २०२४ च्या शिवराज्याभिषेकाला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ६ डिसेंबर या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

याविषयी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘वर्ष २०२४ मध्ये होणार्‍या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे होणार आहेत. महाराष्ट्राची भूमी वीरतेचे प्रतीक आहे. शिवरायांचा राज्याभिषेक हा सम्राट होण्यासाठी नव्हता, तर अन्याय-अत्याचार यांविरुद्ध लढणार्‍या सज्जनांना एकत्र आणण्यासाठी होता. या पार्श्वभूमीवर जगदंब तलवार आणि वाघनखे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही यामध्ये विशेष लक्ष घालण्याची विनंती आम्ही केली आहे.’’