राष्ट्रीय महामार्ग रोखल्याविषयी राजू शेट्टींसह अडीच सहस्र कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

प्रशासन समस्येवर वेळीच योग्य उपाययोजना न काढत असल्याचा परिणाम म्हणून जनतेला वेठीस धरले जाते, हे संतापजनक आहे !

दत्तात्रय वारेगुरुजी यांना यंदाचा ‘सावली’ पुरस्कार घोषित ! – किशोर देशपांडे, सावली

कोल्हापूरमधील ‘सावली केअर सेंटर’च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ध्येयवेड्या पद्धतीने काम करणार्‍या सेवाव्रतीला देण्यात येणारा २०२३ चा ‘सावली’ पुरस्कार शिक्षणक्षेत्रात चमत्कार घडवणार्‍या श्री. दत्तात्रय वारेगुरुजींना देण्याचा निर्णय सावलीच्या निवड समितीने घेतला आहे

२६ आणि २७ नोव्हेंबरला कुमार कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा पर्वकाल ! – अभिनव गिरी

श्री क्षेत्र प्रयाग येथे श्री संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळापासून असणार्‍या कुमार कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी सहस्रोंच्या संख्येने भाविक येतात. या वर्षी कार्तिक शुक्ल चतुर्दशी म्हणजेच २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांपासून ते २७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र आहे.

सौंदत्ती येथील रेणुकादेवीच्या यात्रेसाठी ‘गोकुळ दूध’च्या वतीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची व्यवस्था !

सौंदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत होत आहे. या कालावधीत कोल्हापूर येथून जाणार्‍या भाविकांना, विशेषकरून गाडी चालकांना उत्तम प्रतीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची आवश्यकता असते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दरासाठी ‘रस्ता बंद आंदोलन’ : प्रवाशांचे हाल !

प्रतिटनासाठी ३ सहस्र ५०० रुपयांच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २३ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून पुणे-बेंगळुरू महामार्गावर ‘रस्ता बंद आंदोलन’ चालू केले.

केंद्र सरकारच्‍या धोरणाप्रमाणे सरकार उसाला दर देईल ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य

ऊस आंदोलन प्रकरणी सरकार केंद्र सरकारच्‍या धोरणाप्रमाणे सरकार उसाला दर देईल ! या संदर्भात जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती नेमली असून ऊस दर आंदोलनावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

शिवशक्‍ती प्रतिष्‍ठान आयोजित गड-दुर्ग छायाचित्र प्रदर्शन

कोल्‍हापूर येथे शिवशक्‍ती प्रतिष्‍ठानच्‍या वतीने आयोजित दुर्गप्रेमी बळवंत सांगळे यांनी काढलेल्‍या भारतातील गड-दुर्गांच्‍या छायाचित्रांच्‍या प्रदर्शनाचे उद़्‍घाटन छत्रपती शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

मागील हंगामातील साखर कारखान्‍यांची कोणतीही देय रक्‍कम थकित नाही ! – प्रादेशिक सहसंचालक, कोल्‍हापूर

शासनाचे कर लेखापरीक्षण आणि ऊस दर निश्‍चितीचे नियम पहाता साखर कारखान्‍यांची मागील हंगामातील कोणतीही देय रक्‍कम थकित नाही, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कोल्‍हापूर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी कळवली आहे.

कोल्‍हापूर येथे स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिकठिकाणी ‘रस्‍ता बंद’ आंदोलन !

या वर्षी उसाला पहिला हप्‍ता ३ सहस्र ५०० रुपये देण्‍यात यावा, या मागणीसाठी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेने १९ नोव्‍हेंबरला ठिकठिकाणी ‘रस्‍ता बंद’ आंदोलन केले.

कोल्‍हापूर महापालिकेने पाणीपट्टी दर न्‍यून करण्‍याविषयी उपाययोजना कराव्‍यात !- राजेश क्षीरसागर

कोल्‍हापूर शहरास काळम्‍मावाडी धरणातून थेट वाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्‍याची योजना पूर्ण झाली आहे. या योजनेतून शहरवासियांना पाणीपुरवठा करण्‍यास प्रारंभ झाला आहे.