कोल्हापूर-सांगली पूरव्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेची संमती !

३ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास २ सहस्र ३२८ कोटी रुपये जागतिक बँक देणार !

२८ जानेवारीला कोल्हापूर येथे शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन ! – राजेश क्षीरसागर

मुख्यमंत्र्यांचे राज्यभर १६ पदाधिकारी मेळावे पार पडणार आहेत. शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडून आणण्याच्या उद्देशाने हे मेळावे घेण्यात येणार आहेत.

‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित !

– ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला असून त्यात २ कोटी रुपयांचे पारितोषिक महापालिकेला मिळणार आहे.

हिंदू महासभेच्या माजी संघटनमंत्री श्रीमती सुवर्णा संजय पवार यांचे अल्पशा आजाराने निधन ! 

राजारामपुरी येथील हिंदू महासभेच्या माजी संघटनमंत्री श्रीमती सुवर्णा पवार (वय ४६ वर्षे) यांचे ४ जानेवारी या दिवशी शाहूनगर येते रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने अक्षता कलशाचे धामोडमध्ये स्वागत !

अयोध्या येथे होणार्‍या श्री रामलला प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने धामोड येथे (तालुका राधानगरी) अक्षता कलशाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी महिलांनी कलशाचे औक्षण केले. दुपारनंतर कलश दर्शनासाठी ग्रामपंचायतीत ठेवण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने !

देवतांविषयी अभद्र बोलणार्‍यांना जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल !

लक्षतीर्थ वसाहत (कोल्हापूर) येथील अनधिकृत प्रार्थनास्थळाचे पत्रे काढण्यात आले !

ठिकठिकाणी उभारण्यात येणारी अनधिकृत प्रार्थनास्थळे हटवण्यासाठी हिंदूंना का सांगावे लागते ? प्रशासन स्वतःचे कर्तव्य का पार पाडत नाही ?

विशाळगडावरील १६८ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचे प्रावधान ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील १६८ खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी वन विभागाकडून १ कोटी १७ लाख रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.

‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’ची निवडणूक बिनविरोध !

आवेदन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३६ जणांनी आवेदन मागे घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक-व्यापारी यांची सर्वांत मोठी संस्था असलेल्या ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’ची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

१ जानेवारीपर्यंत अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई न केल्यास विश्व हिंदु परिषद कोल्हापूर महापालिकेला घेराव घालेल !

लक्षतीर्थ वसाहतमधील प्रार्थनास्थळांची बांधकामे अनधिकृत असतांना कारवाई करण्यात दिरंगाई केल्याविषयी संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी,