
कोल्हापूर – सौंदत्ती येथील रेणुकादेवीची यात्रा २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत होत आहे. या कालावधीत कोल्हापूर येथून जाणार्या भाविकांना, विशेषकरून गाडी चालकांना उत्तम प्रतीचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांची आवश्यकता असते. तरी ही अडचण लक्षात घेऊन ‘कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटने’ने ‘गोकुळ दूध संघा’चे अधिकारी हणमंत पाटील आणि लक्ष्मण धनवडे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार दूध संघाने ‘यात्रा कालावधीत हे सर्व पदार्थ उपलब्ध करून देण्यात येतील’, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे, उपाध्यक्ष तानाजी चव्हाण, संस्थापक अच्युत साळुंखे, अशोकराव जाधव, सतीश डावरे, गजानन विभूते, सरदार जाधव, आनंदराव पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर