पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात घायाळ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या पाकमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. वझिराबाद येथे मोर्च्याच्या वेळी एका तरुणाने पिस्तूलमधून इम्रान खान यांच्यावर गोळीबार केला. या वेळी इम्रान खान कंटेनर ट्रकवर उभे होते.

लाहोरमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अधिवक्त्यांच्या जमावाने घेरले !

लाहोर येथे २७ ऑक्टोबरच्या सायंकाळी एका कार्यक्रमाच्या वेळी पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अधिवक्त्यांच्या जमावाने घेरले. या वेळी जमावाने खान यांना उद्देशून ‘घडी चोर’च्या घोषणाही दिल्या. या प्रसंगी खान स्वत: जमावाला बाजूला करत होते.

पाकच्या निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांच्यावर ५ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी !

खान पंतप्रधानपदी असतांना त्यांना विदेशी अधिकार्‍यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंविषयीची त्यांनी निवडणूक आयोगाला वस्तूनिष्ठ माहिती पुरवली नाही, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

मोदी यांची परदेशात कोणतीच मालमत्ता नाही ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर भारतातील उपटसुंभ टोळीने त्यांना ‘भाजपचे एजंट’ असल्याचे म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पिठाला किलोग्रॅमऐवजी लिटरमध्ये मोजल्याने त्यांच्यावर टीका !

इम्रान खान यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना सामाजिक माध्यमांवर पुष्कळ टीका केली जात आहे.

इम्रान खान यांचे विमान आपत्कालीन स्थितीत उतरवले

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना घेऊन जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आले. इम्रान खान एका सभेला संबोधित करण्यासाठी विशेष विमानाने गुंजरावाला येथे जात होते.

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेला २५ ऑगस्टपर्यंत स्थगिती

पाकचे माजी पंतप्रधान आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ३ दिवसांचा अंतरिम जामीन संमत केला आहे.

इम्रान खान यांनी पुन्हा केले भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे कौतुक !

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लाहोर येथील एका सभेमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस्. जयशंकर यांचा व्हिडिओ दाखवून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे पुन्हा एकदा कौतुक केले.

पाकचे ३ तुकडे झाल्यावर इम्रान खान अमेरिकेकडे राजकीय आश्रय मागतील ! – तस्लिमा नसरीन

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वाटते की, पाकिस्तानचे ३ तुकडे होतील. एक भाग भारतात जाईल, दुसरा भाग अफगाणिस्तानात जाईल आणि तिसरा भाग स्वतंत्र बलुचिस्तान म्हणून अस्तित्वात येईल.

..तर पाकचे ३ तुकडे होणार ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

भारत बलुचिस्तानला वेगळे करण्यासाठी प्रयत्नात असल्याचाही आरोप