इम्रान खान यांच्या पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार त्यागपत्र देणार

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार त्यागपत्र देणार असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील ‘एक्सप्रेस ट्रिब्युन’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. रावळपिंडीत झालेल्या एका सार्वजनिक सभेत खान यांनी ही घोषणा केली. या वेळी खान यांनी ‘पाकिस्तानची हानी करण्याऐवजी ही भ्रष्ट व्यवस्था सोडून जाणेच योग्य आहे’, असे म्हटले आहे. देशात लवकरात लवकर निवडणूक घेण्यास सत्ताधार्‍यांना भाग पाडण्यासाठी खान यांच्याकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.