(म्हणे) ‘भाजप सरकार अधिक राष्ट्रवादी असल्याने भारताशी संबंध सुधारणे शक्य नाही !’ – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताशी संबंध सुधारावेत, अशी माझी इच्छा आहे; मात्र भारतात भाजप सत्तेत असेपर्यंत असे होण्याची अजिबात शक्यता नाही. भाजप अधिक राष्ट्रवादी आहे, असे मत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. ‘द टेलिग्राफ’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हे मत मांडले आहे.

इम्रान खान यांनी म्हटले की,

१. दोघांचे संबंध सुधारले, तर अनेक लाभ आहेत; पण काश्मीर हा यातील मुख्य अडथळा आहे. काश्मीर सूत्रावर तोडगा काढण्यासाठी योग्य योजना हवी.

२. मला वाटते संबंध सुधारणे शक्य आहे; मात्र भाजप सरकार खूप कट्टर आहे. अनेक सूत्रांवर त्याची राष्ट्रवादी भूमिका आहे. ते सतत राष्ट्रीय भावनांना फुंकर घालत असल्याने कोणताही करार न होणे निराशाजनक आहे. एकदा हा राष्ट्रवादाचा राक्षस बाटलीतून बाहेर पडला की, त्याला पुन्हा आत घालणे कठीण आहे.

संपादकीय भूमिका

गेल्या ७५ वर्षांत भारतात अन्य पक्षांचेही सरकार होते; मग पाकिस्तानने त्या वेळी भारताशी संबंध का सुधारले नाहीत ? ‘भारताशी ४ युद्धे करायची, जिहादी आतंकवाद निर्माण करायचा, भारताविषयी द्वेष पसरवायचा आणि दुसरीकडे संबंध सुधारण्याच्या उलट्या बोंबा ठोकायच्या हिच पाकची नीती राहिल्याने त्याच्याशी संबंध सुधारू शकत नाही’, असे भारताने खान यांना सुनावले पाहिजे !