भारताच्या पराकोटीच्या अधोगतीचे कारण आणि उपाय

‘भारत पराकोटीच्या अधोगतीला जाण्याचे एकमेव कारण म्हणजे ‘आजार होऊ नये, यासाठी उपाय न करता आजार झाल्यावर वरवरचे उपाय करणारी स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची सरकारे ! यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी गोवा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सोनेरी रथात पाहून माझी भावजागृती झाली. ‘तो रथ भूमीवर नसून अधांतरी जात आहे आणि दिंडीतील साधकही अधांतरी चालत आहेत’, असे मला वाटले.

तिसरे महायुद्ध समीप येत आहे !

‘आग घराजवळ येत असते, तेव्हा आपण प्राण वाचवण्यासाठी धावपळ करतो. आता तिसरे महायुद्ध जवळ येत असल्याने त्यात जिवंत रहाण्यासाठी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या धर्मकार्याने विहंगम गतीने घेतलेली गरुडझेप !

नामसत्संगाने सर्वांत मोठे केलेले कार्य, म्हणजे या सत्संगाने लोकांना ‘संकटाच्या वेळी नामजप कसा करावा ?’, हे शिकवले. त्यामुळे समाजाला आध्यात्मिक आधार मिळाला.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे सर्वांत मोठे दोष म्हणजे जिज्ञासेचा अभाव आणि ‘मला सर्व कळते’, हा अहंभाव !

‘मीही ४१ व्या वर्षापर्यंत देवाला मानत नव्हतो. पुढे संमोहन उपचारशास्त्राची मर्यादा कळल्यावर मी साधनेला लागलो. तेव्हा जिज्ञासेपोटी संतांना सहस्रो प्रश्न विचारून आणि साधना करून अध्यात्मशास्त्र समजून घेतले. नाहीतर मीही आणखीन एक निर्बुद्ध बुद्धीप्रामाण्यवादी झालो असतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधकांवर प्रीतीचा वर्षाव करून त्यांना क्षणोक्षणी साहाय्य करून त्यांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘११.५.२०२४ या दिवशी एका सत्संगात माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर माझा साधनाप्रवास माझ्या डोळ्यांसमोर तरळला आणि प्रत्येक प्रसंगात प.पू. डॉक्टरांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) मला ‘कसे सांभाळले ? मार्गदर्शन केले ?’, त्याविषयी सर्व आठवले.

स्वतःला पुष्कळ शारीरिक थकवा असूनही साधकांचा विचार करणारी गुरुमाऊली !

‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले पू. (श्रीमती) निर्मला दाते यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांना पुष्कळ शारीरिक थकवा होता. त्या खोलीत आम्ही ४ साधक उभे होतो. परात्पर गुरु डॉक्टरांना थकवा असल्याने क्षीण झालेल्या आवाजात ते एका साधकाला म्हणाले…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी साधकाला आलेली अनुभूती !

११.५.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव फर्मागुढी (गोवा) येथील मैदानात साजरा करण्यात आला. या सोहळ्यापूर्वी साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

हिंदु राष्ट्रासाठी आध्यात्मिक बळ आवश्यक !

‘एका ॲटम्बॉम्बमध्ये लाखो बंदुकांचे सामर्थ्य असते, तसे आध्यात्मिक बळामध्ये भौतिक, शारीरिक आणि मानसिक बळांच्या अनंत पटींनी सामर्थ्य असते. असे असल्यामुळे धर्मप्रेमींनी ‘संख्याबळ अल्प असतांना हिंदु राष्ट्र कसे होईल ?’, याची काळजी करू नये.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कृपाछत्र असतांना साधकांनी तणावविरहित, सकारात्मक आणि आनंदी राहून साधना करणे आवश्यक !

आपण स्वतःतील आणि इतरांमधील गुण पाहून सकारात्मक अन् आनंदी रहाणे आवश्यक असणे