इतरांना साहाय्य करणारे आणि धर्माभिमान्यांशी जवळीक साधणारे देहली सेवाकेंद्रातील श्री. कार्तिक साळुंके (वय ३९ वर्षे) !

दादा जिज्ञासूंना साधनेमुळे स्वतःला आलेल्या अनुभूती आणि अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी कृतज्ञताभावाने सांगतात. त्यामुळे जिज्ञासूंना साधना करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

देवाच्या अनुसंधानात असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पनवेल, जिल्हा रायगड येथील कु. काव्यांश जुनघरे (वय ८ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल अष्टमी (१७.३.२०२४) या दिवशी पनवेल, रायगड येथील बालसाधक कु. काव्यांश जुनघरे याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. अमृता जुनघरे यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याच्यामध्ये जाणवलेले वैशिष्टपूर्ण पालट खाली दिले आहेत.

दायित्व घेऊन सेवा करणार्‍या आणि भगवान शिव अन् संत यांच्याप्रती भाव असणार्‍या कु. स्मितल भुजले (वय ३३ वर्षे) !

ती तिच्या मनातील विचार वेळोवेळी योग्य साधकांना सांगते आणि त्यांच्याकडून साधनेचे योग्य दृष्टीकोन घेऊन सतत प्रयत्न करत असते. तिच्यात अंतर्मुखता असल्यामुळे ‘आपण कुठे न्यून पडतो ? काय प्रयत्न करायला हवेत ?’, हे तिच्या लक्षात येते आणि त्यासाठी ती प्रयत्नरत असते.

समंजस आणि राष्ट्र अन् धर्म यांचा अभिमान असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. अथर्व विजय पाटील (वय १३ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल षष्ठी (१५.३.२०२४) या दिवशी कु. अथर्व विजय पाटील याचा १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमळ आणि संत अन् साधक यांच्याप्रती भाव असलेले क्षेत्रमाहुली, सातारा येथील श्री. सुनील नामदेव लोंढे आणि सौ. सुलभा सुनील लोंढे !

श्री गुरूंनी मला साधक आई-बाबांच्या पोटी जन्माला घालून साधनेचा मार्ग दाखवला’, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

अंतर्मुख वृत्ती आणि अल्प अहं असलेले गोवा येथील कै. राघवेंद्र माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘काही दिवसांपूर्वी माझी माणगावकर यांच्याशी भेट झाली, त्या वेळी अंतर्मुख आणि भावावस्थेत असलेल्या माणगावकर यांना पाहिल्यावर ‘त्यांची साधना चांगल्या प्रकारे चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले.

नागेशी (फोंडा, गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. राघवेंद्र माणगावकर (वय ६७ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या मुलाला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

आज १४.३.२०२४ या दिवशी श्री. राघवेंद्र माणगावकर यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले कै. राघवेंद्र माणगावकर !

३.३.२०२४ या दिवशी मला राघवेंद्र माणगावकरकाका यांचे निधन झाल्याचे समजल्यावर मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘स्थूलदेह सोडताक्षणी माणगावकरकाका सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे गेले आहेत…

कर्करोगाने गंभीर रुग्णाईत असूनही स्थिर, आनंदी आणि भावाच्या स्थितीत रहाणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे जळगाव येथील श्री. भिकन मराठे (वय ४६ वर्षे)!

पूर्वी ते पुष्कळ व्यसनाधीन होते; पण आता त्यांचे व्यसन पूर्णपणे सुटले आहे.‘आधीच्या तुलनेत त्यांच्यात प्रेमभाव पुष्कळ वाढला असून ते सर्वांशीच प्रेमाने बोलतात.