‘श्री. भिकन मराठे हे माझ्या यजमानांचे मोठे भाऊ आहेत. त्यांना मूत्रपिंडाचा (रिनल सेल कारसिनोमा- Renal cell carcinoma) कर्करोग झाला असून तो ४ थ्या पातळीवर (स्टेजवर) गेला आहे. २७.१२.२०२३ या दिवशी त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. तेव्हा सर्वांचीच पुष्कळ भावजागृती झाली. मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट येथे दिले आहेत.
१. सहनशीलता
श्री. भिकन मराठे यांचा कर्करोग ४ थ्या पातळीवर गेला आहे; पण त्यांच्याकडे पाहून तसे जाणवत नाही. त्यांना पुष्कळ वेदना सहन कराव्या लागतात, तरीही ते भावाच्या स्थितीत रहातात. त्यामुळे ते पुष्कळ आनंदी दिसतात.
२. प्रेमभाव
कुटुंबातील सर्वांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी ते सर्वांत अगोदर धावून जातात.
३. साक्षीभाव
ते प्रत्येकच प्रसंगाकडे साक्षीभावाने पहातात. त्यामुळे ते स्थिर असतात.
४. साधनेची तळमळ
‘घरातील सर्वांनी साधना करावी’, अशी त्यांची तळमळ आहे.
५. सेवेची तळमळ
इतके गंभीर रुग्णाईत असूनही ते ‘मी काय सेवा करू शकतो ?’, याचे सतत चिंतन करतात. ते भ्रमणभाषवर इतरांना संपर्क करण्याची सेवा करतात.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी असलेली श्रद्धा
‘सर्व काही श्री गुरु करून घेत आहेत. सर्वकाही गुरुकृपेनेच होत आहे’, असा त्यांचा भाव असतो. ते प्रत्येक कृती भावाच्या स्थितीत राहून करतात.
७. जाणवलेला पालट
अ. पूर्वी ते पुष्कळ व्यसनाधीन होते; पण आता त्यांचे व्यसन पूर्णपणे सुटले आहे.
आ. ‘आधीच्या तुलनेत त्यांच्यात प्रेमभाव पुष्कळ वाढला असून ते सर्वांशीच प्रेमाने बोलतात. मी त्यांची भावजय असूनही ते मला आणि माझ्या यजमानांना ‘दादा आणि ताई’, असेच म्हणतात. ते आमच्याशी साधक या भावाने बोलतात.
इ. आता त्यांच्याकडे पाहिल्यावर आनंद वाटतो.
ई. आता त्यांच्या बोलण्यात चैतन्य आले आहे.
गंभीर रुग्णाईत स्थितीतही ‘देव त्यांच्याकडून साधना करून घेत आहे’, यासाठी देवाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता ! ‘त्यांची जलद आध्यात्मिक उन्नती होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना ! ’
– सौ. बबिता मराठे (भावजय), जळगाव (२७.२.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |