समंजस आणि राष्ट्र अन् धर्म यांचा अभिमान असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. अथर्व विजय पाटील (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अथर्व विजय पाटील हा या पिढीतील एक आहे !

 ‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

(‘वर्ष २०१८ मध्ये कु. अथर्व विजय पाटील याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती आणि आता वर्ष २०२४ मध्येही त्याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)

फाल्गुन शुक्ल षष्ठी (१५.३.२०२४) या दिवशी कु. अथर्व विजय पाटील याचा १३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. अथर्व पाटील

कु. अथर्व पाटील याला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. समंजस

‘आमच्या घरात काही वाद झाल्यास अथर्व आम्हाला समजावून सांगतो आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो.

२. परिस्थिती स्वीकारणे

आम्ही ४ वर्षे सिल्वासा, गुजरात येथे रहात होतो. जानेवारी २०२२ मध्ये आम्ही तेथून जळगाव येथे रहायला आलो. आम्ही जळगाव येथे आल्यानंतर मला १ मास येथील परिस्थिती स्वीकारता येत नव्हती; मात्र अथर्वने एकदाही गार्‍हाणे केले नाही किंवा तो नाराज झाला नाही.

३. ‘देवतेचे विडंबन होऊ नये’, यासाठी सतर्क असणे

अ. आम्ही रहात असलेल्या वसाहतीतील लोक नवरात्रीच्या कालावधीत चित्रपटांतील गाण्यांवर गरबा खेळत होते. तेव्हा अर्थवने मला विचारले, ‘‘अशा गाण्यांवर गरबा खेळणे, म्हणजे दुर्गादेवीचे विडंबन आहे का ?’’ मी त्याला ‘तसे करणे म्हणजे देवतेचे विडंबन करणे आहे’, असे सांगितले. तेव्हा तो गरबा खेळण्यात सहभागी झाला नाही.

आ. एप्रिल २०२२ मध्ये आम्ही पुणे येथे स्थलांतर केले. तेव्हा तेथे आधी रहात असलेल्या लोकांनी घरात लावलेली गणेशाचे चित्र असलेली फ्रेम (चौकट) अथर्वच्या आईने आगाशीत ठेवली. तेव्हा अथर्वने त्याच्या आईला फ्रेममधील गणपतीचे चित्र काढून घ्यायला सांगितले आणि नंतरच फ्रेम बाहेर ठेवली.

४. राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान असणे

अ. मार्च २०२२ मध्ये आम्ही गावी असतांना अथर्व त्याच्या आजोबांच्या समवेत पेठेत पाव आणायला गेला होता. तो विक्रेता धर्मांध होता. तेव्हा तो आजोबांना म्हणाला, ‘‘मला पाव मिळाला नाही, तरी चालेल नाही; पण त्या धर्मांधाकडून पाव घेऊ नका.’’

आ. तो दूरचित्रवाणीवर दाखवण्यात येणारी राष्ट्राशी संबंधित वृत्ते पहातो आणि त्याविषयी प्रश्नही विचारतो.’

– श्री. विजय पाटील (कु. अथर्वचे वडील), भोर, जिल्हा पुणे. (१०.९.२०२३)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.