गणेशोत्सव मिरवणुकीतून परत आल्यावर लोकमान्य टिळक यांनी ‘आपले राष्ट्रीय उत्सव’ या मथळ्याचे संपादकीय लिहिले होते. त्यांच्या संपादकीय लेखामुळे स्वातंत्र्यचळवळीत एक अध्याय चालू झाला आणि त्यातून स्वातंत्र्य चळवळीचे अनेक उपक्रम उभे राहिले. टिळकांनी १९०० ते १९१५ या काळात लिहून ठेवले होते, ‘अजून स्वातंत्र मिळायला किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही; पण जेव्हा स्वातंत्र मिळेल, तेव्हाच्या तरुण पिढीने बृहद् भारताच्या सीमा निश्चित कराव्यात. त्या सीमा निश्चित करण्याचे सूत्र असे की, जेथे म्हणून गणपति हे दैवत पोचले आहे, तिथे बृहद् भारताच्या चतुःसीमांच्या खुंट्या ठोकाव्यात. विदेशातही जेथे आज गणपति आहे, त्या ठिकाणापर्यंत एकेकाळी बृहद् भारत विस्तारला होता, हे लक्षात घ्यावे. सध्याच्या पारतंत्र्याच्या काळात हे खरे वाटणार नाही आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरही लगेच याची प्रचीती येणार नाही; पण त्यापुढील १०० वर्षांत हे स्पष्ट होणार आहे.’
– श्री. मोेरेश्वर जोशी (संदर्भ : ‘आध्यात्मिक ॐ चैतन्य’, गुरुपौर्णिमा विशेषांक)
(अनेक संत-महंतांनी सांगितल्यानुसार वर्ष २०२५ पासून भारतात आणि पुढे जगभर ‘हिंदु राष्ट्र’ (रामराज्य) स्थापन होणार आहे. त्या वेळी अन्य देशांतील नागरिकसुद्धा धर्माचरण (श्री गणपति आदी देवतांची उपासना) करतील. थोडक्यात सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांप्रमाणे जगभरातील नागरिक ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतील. ही गोष्ट लोकमान्य टिळकांना साधनेद्वारे लाभलेल्या द्रष्टेपणामुळे वर्ष १९१५ पूर्वीच ठाऊक होती, असे त्यांच्या वरील वाक्यावरून स्पष्ट होते. – संकलक)