सातारा जिल्ह्यात महावितरणकडून १० सहस्र ३७६ शेतकर्‍यांच्या शेती पंपांना विद्युत् पुरवठा

शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री विजेरी घेऊन शेताच्या बांधावर जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे शेतकर्‍यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

शेतकर्‍यांच्या समृद्धीचे जलयुक्त शिवार – २ !

जलयुक्त शिवार अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले. ज्यामुळे शेतकर्‍यांना खरिपासमवेतच रब्बीच्या हंगामातही शेती करणे शक्य झाले.

सूतगिरण्‍यांना राज्‍यशासन आणि अधिकोष यांच्‍याकडून एकाच वेळी भांडवल उपलब्‍ध करून देणारी कार्यप्रणाली आखणार ! – चंद्रकांत पाटील, वस्‍त्रोद्योगमंत्री

सूतगिरण्‍या चालू होण्‍यासाठी राज्‍यशासनाच्‍या वतीने ४५ टक्‍के भांडवल, तर अधिकोषाकडून ४० टक्‍के कर्ज आणि वैयक्‍तिक ५ टक्‍के अशा प्रमाणात भांडवल गुंतवून सूतगिरणी चालू होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शेतकर्‍यांची फसवणुकीची तक्रार !

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासद आणि समभाग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार २५ शेतकर्‍यांनी कोल्हापूर येथील आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे केली आहे.

शेतकरी संकटात असल्याने हानीग्रस्त भागातील कर्मचार्‍यांनी कामावर उपस्थित रहावे ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

शेतकर्‍यांच्या प्रश्नासह सरकारी कर्मचार्‍यांचा प्रश्न सरकार असंवेदनशीलपणे हाताळत आहे, असा आरोप करून विरोधी पक्षाने २० मार्च या दिवशी विधानसभेतून सभात्याग केला.

शेतकर्‍यांच्‍या प्रश्‍नांवरून विधानभवनाच्‍या पायर्‍यांवर विरोधकांचे आंदोलन !

महाविकास आघाडीच्‍या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्‍या नेतृत्‍वाखाली हे आंदोलन केले.

देहलीच्या रामलीला मैदानात सहस्रो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत झाली संयुक्त किसान मोर्चाची महापंचायत

नवी देहली येथील रामलीला मैदानात संयुक्त किसान मोर्चाकडून  महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक येथे अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे पिकांची हानी !

अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे हाताशी आलेल्या पिकांची प्रचंड हानी झाली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात २ बैल आणि ३ गायी दगावली असून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. 

शेतकरी जगला तरच राज्य जगेल; राज्यातील शेतकरी हवालदिल ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यात ३ दिवस पडलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. राज्यात पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. हवामान विभागाने राज्याला ‘येलो अलर्ट’ दिला आहे; मात्र राज्यातील सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे.

विमा नाकारलेल्या शेतकर्‍यांच्या प्रस्तावांची पुनर्पडताळणी करण्यात येईल ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

ज्या हानीग्रस्त शेतकर्‍यांचे प्रस्ताव विमा आस्थापनांनी फेटाळले आहेत, त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या प्रस्तावांची पुनर्पडताळणी करण्यात येईल. येत्या १५ दिवसांत याविषयीचा अहवाल मागवण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिले.