देहलीच्या रामलीला मैदानात सहस्रो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत झाली संयुक्त किसान मोर्चाची महापंचायत

आधारभूत किमतीवर कायदेशीर हमी, विनामूल्य वीज आणि कर्जमाफीची मागणी !

नवी देहली – येथील रामलीला मैदानात संयुक्त किसान मोर्चाकडून  महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सहस्रोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकर्‍यांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे न घेणे, कर्जमाफी, विनामूल्य वीज आणि किमान आधारभूत किंमत (एम्.एस्.पी.) न देण्याच्या निषेधार्थ ही महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या महापंचायतीत ३२ शेतकरी संघटनांचे शेतकरी सहभागी झाले होते.


संयुक्त किसान मोर्चाचे कार्यकर्ते म्हणाले की, सरकारने एकूण उत्पादन खर्चावर ५० टक्के एम्.एस्.पी. लागू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीत २६ सदस्य उद्योजकांच्या बाजूने होते. त्यामुळे शेतकरी या समितीला विरोध करत आहेत.