याचे उत्तर कोण देणार ?
कुंभमेळा होऊच नये, यासाठी सरकारने प्रयत्न केले. साधू-महंतांनी विरोध केल्याने त्याला अनुमती मिळाली.
कुंभमेळा होऊच नये, यासाठी सरकारने प्रयत्न केले. साधू-महंतांनी विरोध केल्याने त्याला अनुमती मिळाली.
बेंगळुरू येथे कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानासमोर शववाहिन्यांची रांग लागली आहे. याचा दुरुपयोग करून घेणार्या खासगी रुग्णवाहिका आणि पालिकेचे काही कर्मचारी तात्काळ अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांकडून ३५ ते ४० सहस्र रुपये घेत आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण राज्यातील मठ आणि मंदिरे यांत अग्निहोत्र करण्यात यावे, असा आदेश देण्यात येईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी बेळगाव येथील एका कार्यक्रमात म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘देशाची राष्ट्रभाषा ही संस्कृत असायला हवी’, असा प्रस्ताव दिला होता; कारण उत्तर भारतात तमिळला, तर दक्षिण भारतात हिंदीला विरोध होऊ शकतो, हे त्यांना ठाऊक होते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केले.
बंगालच्या दिनाजपूर येथे आरोपीला पकडण्यासाठी गेलेले बिहारचे पोलीस अधिकारी अश्विनी कुमार यांची हत्या करण्यासाठी तेथील एका मशिदीतून ध्वनीक्षेपकाद्वारे उद्घोषणा करून जमावाला बोलावण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.
चित्रकूट (उत्तरप्रदेश) येथील द्वारकापुरीमध्ये बिलाल अहमद या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यानंतरही त्याने चिकित्सालय चालूच ठेवून विनामास्क अनेक रुग्णांवर उपचार केले. तसेच सामूहिक नमाजपठणालाही तो विनामास्क उपस्थित होता.
आगामी वर्ष आणीबाणी आणि युद्ध यांचे असेल, असे ज्योतिषांनी म्हटले आहे. कोरोनाचा संसर्गही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारी यंत्रणा जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यात अल्प पडत आहे. अशा वेळी सुरक्षित रहाण्यासाठी भक्त बनून देवाची कृपा संपादन करा !
उत्तरप्रदेशातील डासना देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून बरेली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर सहस्रावधी मुसलमानांनी त्यांचा शिरच्छेद करण्याची मागणी केली.
राजस्थानच्या महवा येथे भूमाफियांनी मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण केल्याने निराश झालेले पुजारी शंभु शर्मा यांचा मृत्यू झाला होता. यामुळे ‘भूमाफियांवर कारवाई होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही’, असे सांगत गेले ७ दिवस आंदोलन चालू आहे.
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारधामसहित ५१ मोठी मंदिरे देवस्थान बोर्डातून म्हणजेच सरकारीकरणातून लवकरच मुक्त करण्यात येतील, असे आश्वासन साधू आणि संत यांना दिले.