आता सत्य जगासमोर येईल !
श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या भूमीवर असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या अतिक्रमणाच्या प्रकरणी वाराणसी जलदगती न्यायालयाने पुरातत्व विभागाला सर्वेक्षण आणि उत्खनन करण्याची अनुमती दिली आहे.
श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या भूमीवर असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या अतिक्रमणाच्या प्रकरणी वाराणसी जलदगती न्यायालयाने पुरातत्व विभागाला सर्वेक्षण आणि उत्खनन करण्याची अनुमती दिली आहे.
‘वेतन घेणारे कामगार जर कामाच्या वेळी मरत असतील, तर त्यांना ‘हुतात्मा’ कसे म्हणू शकतो ?’ अशी आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी लेखिका शिखा सरमा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या अंतर्गत अटक केली आहे.
आगरा येथील रायभा भागामध्ये हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष रौनक ठाकुर गोतस्करी रोखण्यासाठी गेले असता त्यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याने ते गंभीररित्या घायाळ झाले.
इंग्लंडचे क्रिकेटपटू मोईन अली आयपीएल् क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज या संघाकडून खेळतात. या संघाच्या टी शर्टवर एका मद्य आस्थापनाचा लोगो असल्याने मोईन अली यांनी तो काढण्याची मागणी केल्यावर तो लोगो हटवण्यात आला.
जगात एकीकडे मोठे धर्म (ख्रिस्ती, हिंदु आदी) ११ ते ३५ टक्क्यांच्या गतीने वाढत आहेत, दुसरीकडे मुसलमानांची लोकसंख्या ७३ टक्क्यांनी म्हणजे सर्वाधिक गतीने वाढत आहे, असा अहवाल अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने दिला आहे.
सध्याचे शासनकर्ते देशाला हिंदु राष्ट्र बनवू पहात आहेत, असा आरोप शिखांची धार्मिक संघटना शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने केला आहे.
काश्मीरच्या पुलवामा येथील चकमकीमध्ये ४ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. या वेळी स्थानिकांनी सुरक्षादलांना विरोध केला. त्यांच्यावर कारवाई केल्यावर २ जण घायाळ झाले. या चकमकीत श्रीनगरमध्ये भाजपच्या नेत्याच्या घरावर बुरखा घालून आक्रमण करणार्या आतंकवाद्याचाही समावेश आहे.
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सैरया भागामध्ये होळीच्या दिवशी मुसलमान व्यक्तीवर रंग उडल्याने झालेल्या वादातून धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात काही हिंदू घायाळ झाले. पोलिसांनी अजीम आणि आसिम यांना अटक केली आहे.
गुजरातमधील इशरत जहाँ चकमकीच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३ पोलीस अधिकार्यांची निर्दोष मुक्तता केली. ‘इशरत जहाँ ही आतंकवादी नव्हती, याचे कोणतेही पुरावे नाहीत’, असेही न्यायालयाने म्हटले.
बांगलादेशातील महंमदपूर उपजिल्ह्यात असणार्या ४०० वर्षे प्राचीन परुर्कुल अष्टग्राम महा स्मशान आणि राधा गोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला. यामुळे येथील रथ आणि देवतांच्या मूर्ती भस्मसात झाल्या.