अशा काँग्रेसी धर्मांधांना आजन्म कारागृहात टाका !
दंतेवाडा (छत्तीसगड) येथे काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या आणि न्यायपालिका यांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दंतेवाडा (छत्तीसगड) येथे काँग्रेसी नेता बबलू सिद्दकी याने सामाजिक माध्यमांतून हिंदूंच्या देवतांच्या आणि न्यायपालिका यांच्या विरोधात पोस्ट शेअर केल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील २ मंत्री फिरहाद हकीम आणि सुब्रत मुखर्जी, तसेच आमदार मदन मित्रा यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
देहली पोलिसांनी उत्तरप्रदेशातील गाझियाबादच्या डासना येथील मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या हत्येचा कट रचणार्या महंमद डार उपाख्य जहांगिर याला अटक केली आहे.
आंध्रप्रदेशातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेसचे बंडखोर खासदार रघुराम कृष्णम् राजू यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजू हे राज्यातील ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत.
ईदच्या निमिताने पंजाबमधील काँग्रेस सरकारने राज्यातील मलेरकोटला हा मुसलमानबहुल भाग स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला आहे. या जिल्ह्यात मुसलमानांची लोकसंख्या ९० टक्के आहे.
फ्रान्सच्या ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकाने त्याच्या अंकामध्ये प्रसिद्ध केलेल्या चित्राच्या खाली, ‘३ कोटी ३० लाख देवता; मात्र एकही ऑक्सिजनचे उत्पादन करण्यास सक्षम नाही,’ असे लिहून हिंदूंच्या देवतांचा अवमान केला आहे.
अफगाणिस्तानमध्ये रमझानच्या मासात तालिबानकडून १५ आत्मघातकी आणि अन्य २०० बॉम्बस्फोटांसह आक्रमणे करण्यात आली. यात एकूण २५५ नागरिक ठार झाले, तर ५०० हून अधिक जण घायाळ झाले.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचे एक छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात त्यांनी परिधान केलेल्या जॅकेटच्या मागच्या बाजूला श्री महाकाली देवीचे चित्र आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका होत आहे.
धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी असतांना १४ मे या दिवशी रमझान ईद असल्याने १२ मे पासून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत चालू रहातील, असा आदेश जिल्हाधिकार्यांनी काढला आहे.
बनासकांठा (गुजरात) येथील तेतोडा गावातील एका गोशाळेचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यात आले आहे. येथील रुग्णांवर गायीचे दूध आणि गोमूत्र यांपासून बनवण्यात आलेल्या औषधांच्या साहाय्याने उपचार केले जात आहेत.