सुभाष चंद्र बोस यांच्या पणतीला केले नजरबंद, तर विश्‍व हिंदु सेनेच्या अध्यक्षाला अटक !

श्रावणी सोमवारनिमित्त ज्ञानवापीतील शृंगारगौरी येथे जाऊन करणार होते जलाभिषेक !

राजश्री चौधरी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पणती राजश्री चौधरी यांना पोलिसांनी येथे नजरबंद केले आहे. त्या श्रावणी सोमवारनिमित्त वाराणसी येथे जाऊन ज्ञानवापीमध्ये शृंगारगौरी येथे जलाभिषेक करणार होत्या. त्यांना प्रयागराज रेल्वे स्थानकावरून कह्यात घेण्यात आले. दुसरीकडे याच कारणावरून विश्‍व हिंदु सेनेचे अध्यक्ष अरुण पाठक यांना आणि त्यांचे ४ समर्थक यांना पोलिसांनी अटक केली आहे. अरुण पाठक यांनीच ज्ञानवापीमध्ये जाऊन जलाभिषेक करण्याचे आवाहन केले होते. ते वाराणसी येथील अस्सी घाटावरून गंगाजल घेऊन जात असतांना त्यांना अटक करण्यात आली.