वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी आणि तेथील शृंगार गौरी प्रकरणातील पक्षकार डॉ. सोहनलाल आर्य यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानमधील संपर्क क्रमांकावरून आलेल्या दूरभाषद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणार्याने सांगितले, ‘कन्हैयालाल याच्याप्रमाणे तुमचाही शिरच्छेद केला जाईल.’ याप्रकरणी डॉ. आर्य यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यांना यापूर्वीच पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे. डॉ. आर्य यांना याच वर्षी १९ मार्च आणि १९ जुलै या दिवशीही ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. डॉ. सोहनलाल आर्य हे वर्ष १९८४ मध्ये विश्व हिंदु परिषदेचे उपाध्यक्ष होते. सध्या ते रा.स्व. संघाचे प्रांतीय पदाधिकारी आहेत.
याविषयी डॉ. आर्य यांनी सांगितले की, गुप्तचर विभागाच्या अधिकार्यांशी याविषयी चर्चा करण्यात आली आहे. त्यांच्या संशयानुसार भारतातीलच कुणीतरी पाकिस्तानचा क्रमांक वापरून दूरभाष करत आहे. काही जिहादी आतंकवादी संघटना माझ्या मागे लागल्या आहेत. त्यांनी मला ज्ञानवापीचा खटला मागे घेण्यास सांगितले आहे. तथापि मी त्यांच्या धमकीपुढे झुकणार नाही. हिंदुत्व आणि मंदिर यांच्या रक्षणासाठी प्राण गेले, तरी मला काहीही वाटणार नाही.
Husband of petitioner, fighting for Hindus’ right to worship at Gyanvapi, gets ‘sar tan se juda’ threats from Pakistan, asked to take back casehttps://t.co/BVtSHu5ct0
— OpIndia.com (@OpIndia_com) August 18, 2022