(म्हणे) ‘औरंगजेबाने ज्ञानवापीची संपत्ती दान केल्यावर तेथे मशीद बांधली गेली !’ – मुसलमान पक्षाकाराचा फुकाचा दावा

ज्ञानवापी खटला

वाराणसी (उत्तरप्रदेश) – मोगल बादशाह औरंगजेब वर्ष १६६९ मध्ये सत्तेवर होता. त्यामुळे त्याकाळी जी काही संपत्ती होती ती बादशाह औरंगजेबाची होती. औरंगजेबाने जेव्हा ज्ञानवापीची संपत्ती दान केली, तेव्हा तिथे मशीद बांधली गेली, असा फुकाचा दावा ज्ञानवापीच्या प्रकरणातील मुसलमान पक्षकार असणार्‍या ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी’ने न्यायालयात म्हटले. यावर ‘जर औरंगजेबाने ज्ञानवापी मशिदीची मालमत्ता दान केली होती, तर ती कागदपत्रे न्यायालयात सादर केली जावीत’, अशी मागणी हिंदु पक्षकार असणार्‍या ५ महिलांकडून करण्यात आली. त्याचसह ज्ञानवापीच्या मालमत्तेला वक्फची मालमत्ता म्हणणे ही मोठी फसवणूक असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.

आताच्या सरकारने ३ सहस्र मशिदी कह्यात घ्याव्यात ! – स्वामी जितेंद्रनंद सरस्वती  

स्वामी जितेंद्रनंद सरस्वती

अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रनंद सरस्वती यांनी मुसलमान पक्षाकारांच्या युक्तवादावर म्हटले, ‘त्यांच्या वडिलांनी जणू स्वर्गातून भूमी आणली होती. जर मुसलमान पक्षकारांनी ज्ञानवापीच्या संदर्भात ‘शासकाची आणि सत्ता ज्याच्याकडे असते, त्याची भूमी’, असा युक्तीवाद केला, तर आम्ही सध्याच्या सरकारवर दबाव आणू शकतो. असे केल्यास मंदिरे पाडून ज्या ३ सहस्र मशिदी बांधण्यात आल्या, त्या सरकारने कह्यात घेतल्या पाहिजेत. मुसलमान जो युक्तीवाद करत आहेत, त्याप्रमाणे हेच योग्य राहील; म्हणून मुसलमानांनी असे गैरकृत्य टाळले तर बरे होईल. नाहीतर त्याचे परिणाम त्यांना दीर्घकाळ भोगावे लागतील.

संपादकीय भूमिका

हिंदूंना त्यांच्या हक्काची धार्मिक स्थळे मिळू नयेत, यासाठी मुसलमान कशा प्रकारे दावा करत आहेत, हेच यातून दिसून येते ! ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’च्या घोषणा देणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?