देवेंद्र फडणवीस यांच्यावरील अवमानकारक पोस्टप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर कारवाई करावी ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

आरोप करणार्‍या पुण्यातील व्यक्तीला अटक

मृत्यू संशयास्पद असल्याने प्रकरणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे चौकशी करावी ! – देवेंद्र फडणवीस

मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी ५ मार्च या दिवशी दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. अखेरीस या प्रकरणारचा तपास आतंकवादविरोधी पथकाकडे सोपवल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना ‘पॉझिटिव्ह’ महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारे आधुनिक वैद्य बडतर्फ

महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रामध्ये एका आधुनिक वैद्याने ‘पॉझिटिव्ह’ महिला रुग्णावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संबंधित डॉक्टरला बडतर्फ करण्यात आल्याचे संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी सांगितले.

वारकर्‍यांच्या मागण्या अधिवेशनात मांडल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार !- ह.भ.प. गणेश महाराज शेटे, अध्यक्ष, विश्‍व वारकरी सेना

वारकऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मांडल्या.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर सलग तिसर्‍या दिवशी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्‍यांवर विरोधकांचे आंदोलन

पिकांच्या हानीभरपाईची रक्कम मिळणे, शेतकर्‍यांना पीकविम्यांचे पैसे देणे, कर्जमाफी आदी विविध विषयांवर ३ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्‍यांवर विरोधकांनी आंदोलन केले.

‘सारथी’ बंद करण्यास उपमुख्यमंत्रीच उत्तरदायी ! – नरेंद्र पाटील

पाटण (जिल्हा सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाला मुंद्रुळकोळे ग्रामस्थांसह नरेंद्र पाटील यांनी पाठिंबा दिला. तेव्हा ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैनिकांचा अवमान केला ! – देवेंद्र फडणवीस

ज्या भारतीय सैनिकांनी उणे तापमानात चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले, त्या सैनिकांविषयी बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘चीनसमोर पळ काढला’, असे बोलून सैनिकांचा अवमान केला आहे.

शरजील उस्मानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेहबूब शेख यांवर गुन्हा नोंद करण्याची पोलिसांची हिंमत नाही का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

शरजील आणि शेख या दोघांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना केली.

पोलिसांची इतकी लाचार अवस्था मी यापूर्वी कधीही पाहिलेली नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार्‍या पोलीस निरीक्षकांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकारी पक्षाच्या नेत्यांना लैंगिक अत्याचाराची मोकळीक दिली आहे का ?

महिलांवरील अत्याचाराच्या विरोधातील ‘शक्ती’ हा कायदा हा केवळ फार्स आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना या कायद्यातील तरतुदी लागू होत नाहीत, असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.