पंचनामे होत रहातील, आधी शेतकर्‍यांना साहाय्य करा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

‘राज्यात आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, त्या वेळी सरकारने केलेल्या सर्व घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याच घोषणेची अद्याप पूर्तता झालेली नाही.’, असे फडणवीस यांनी सांगितले.

भाजपच्या उमेदवाराच्या माघारीमुळे हिंगोली येथील राज्यसभेची पोटनिवडणूक विनाविरोध होणार !

भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नेते अन् विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.

मुंबई महापालिका निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळणार – देवेंद्र फडणवीस

मुंबईत काही प्रभागांची तोडफोड करून त्यांना पाहिजे तसा प्रभाग सिद्ध करण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांकडून चालू आहे. निवडणूक आयोगाला याची माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाने कृती केली नाही, तर न्यायालयात जाऊ.

किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाई चुकीची ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले असेल की, एखादी व्यक्ती भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करायला जाते आणि पोलीस त्याला अडवतात.

‘एका कुटुंबात एक उमेदवार’ हे भाजपचे धोरण असेल; परंतु यापूर्वी त्याला काही अपवाद होते ! – देवेंद्र फडणवीस 

भाजपमध्ये मतभेद आहेत;परंतु बंडखोरी नाही ! – देवेंद्र फडणवीस

भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी आजपासून गोवा दौर्‍यावर

देवेंद्र फडणवीस यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे प्रभारी या नात्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांचा हा अनुभव गोव्यातील भाजपला उपयोगी पडणार असल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक मला त्रास द्यायला लागले, तर मी भाजपला बोलावून घेतो, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचा रावसाहेब दानवे यांचा दावा !

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून पुढे भाजप-शिवसेना युती होण्याविषयी राजकीय तर्क-वितर्क चालू झाले आहेत. असे असतांना दानवे यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया देऊन विषयाला वेगळे वळण दिले आहे. 

अमरावती येथे ‘अंडरपास’मध्ये पावसाचे पाणी साचल्याने अपक्ष आमदार रवि राणा यांनी शहर अभियंत्याला साचलेल्या पाण्यातून बळजोरीने चालायला लावले !

रस्त्याची अशी निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेच्या लाखो रुपयांची हानी करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेचे प्रभारी पदाचे दायित्व सोपवले !

उत्तरप्रेदश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यांच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण दायित्व दिले आहे.

२० सहस्र माथाडी कामगारांचे लसीकरण करणार ! – देवेंद्र फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले की, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वतीने राबवला जाणारा माथाडी कामगारांचे विनामूल्य लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशन यांच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.