ज्ञानवापीतील शिवलिंगाचे संरक्षण करण्याचा आदेश कायम !

वाराणसी येथील ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाला  संरक्षण देण्याचा पूर्वी दिलेला आदेश सर्वाेच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. पुढील आदेशापर्यंत संरक्षण देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व ६ दोषींची सुटका !

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात असलेल्या सर्व ६ दोषींना मुक्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. या दोषींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल, तर त्यांना मुक्त करण्यात यावे, असे न्यायालयाने आदेशामध्ये म्हटले आहे.

रेल्वे प्रवासात आता मिळणार सात्त्विक शाकाहारी जेवण !

रेल्वेने प्रवास करणार्‍या यात्रेकरूंना प्रवासाच्या कालावधीत आता सात्त्विक शाकाहारी जेवण मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेचे आस्थापन ‘आय.आर्.सी.टी.सी.’ आणि ‘इस्कॉन’ ही आध्यात्मिक संस्था यांच्यामध्ये करार झाला आहे.

ईशान्य भारताला जाणवले भूकंपाचे धक्के !

ईशान्य भारतात १० नोव्हेंबर या दिवशी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.७ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्‍चिम सियांग येथे होता.

देहलीतील जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार शेख याला पुन्हा अटक

जहांगीरपुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार शेख याला पुन्हा अटक करण्यात आली. रोहिणी न्यायालयाने ४ नोव्हेंबर २०२२ या दिवशी अन्सार शेख याची जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर त्याची जहांगीरपुरीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. काही लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

भ्रष्टाचार ही एक वाईट प्रवृत्ती असून तिच्यापासून दूर रहायला हवे ! – पंतप्रधान मोदी

भ्रष्टाचार ही एक वाईट प्रवृत्ती असून तिच्यापासून सगळ्यांनी दूर रहायला हवे. गेल्या ८ वर्षांत आम्ही ही संपूर्ण व्यवस्था ‘अभाव’ आणि ‘दबाव’ यांपासून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील विज्ञान भवनमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन करतांना केले.

लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी महंमद आरिफची फाशीची शिक्षा कायम !

वर्ष २००० मध्ये देहलीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या आक्रमणाचे प्रकरण
सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुनर्विचार याचिका फेटाळली

पुढील सरन्यायाधीश चंद्रचूड यांना शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पुढील सरन्यायाधीश चंद्रचूड यांना शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश यू.यू. लळीत यांनी फेटाळून लावली. ही याचिका अपसमजातून प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करण्यासारखे काहीच नाही, असे न्यायमूर्ती लळीत यांनी सांगितले.

‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादक यांच्या घरांवर देहली पोलिसांच्या  धाडी

भाजपचे अमित मालवीय यांच्याविषयी खोटे वृत्तांकन केल्याचे प्रकरण

माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्ही आदर कराल, अशी आशा !

भारतातील कथित पुरोगामी आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारी टोळी तस्लिमा नसरीन यांचा आवाज दाबून त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍यांच्या विरोधात काहीही बोलत नाही, हे लक्षात घ्या !