पुढील सरन्यायाधीश चंद्रचूड यांना शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी देहली – पुढील सरन्यायाधीश चंद्रचूड यांना शपथ घेण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश यू.यू. लळीत यांनी फेटाळून लावली. ही याचिका अपसमजातून प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी करण्यासारखे काहीच नाही, असे न्यायमूर्ती लळीत यांनी सांगितले.

१. एका अधिवक्त्याने ही याचिका प्रविष्ट केली होती. त्यात त्याने न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यावर आरोप केला होता की, कोरोना काळामध्ये एका वरिष्ठ अधिवक्त्याचे प्रकरण नोंदवण्यात आले; परंतु कनिष्ठ अधिवक्त्याचे प्रकरण स्वीकारण्यात आले नव्हते.

२. न्यायमूर्ती चंद्रचूड हे भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून ९ नोव्हेंबर या दिवशी शपथ घेणार आहेत. न्यायमूर्ती यू.यू. लळीत सरन्यायाधीश म्हणून त्यांचा ७४ दिवसांचा अल्प कार्यकाळ पूर्ण करून ८ नोव्हेंबर या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत.