दूध आणि दुग्धजन्य पदार्थ : त्याचे लाभ, समज अन् गैरसमज
बरेच पालक स्वतःच्या मुलांविषयी ‘डॉक्टर बघा ना, हा दूधच पित नाही. दूध प्यायले नाही, तर याला ‘कॅल्शियम’ कसे मिळणार ? याची हाडे मजबूत कशी होणार ? दात कसे मजबूत होणार ?’ अशा असंख्य काळजीचे विचार आणि तक्रारी घेऊन येतात.