रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधनावृद्धी शिबिरा’त सहभागी झालेल्या साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
‘शिबिरातील तीनही दिवसांचे विषय आणि एकंदरीत रूपरेषाही सर्व साधकांचे व्यष्टी अन् समष्टी साधना यांचे प्रयत्न यामध्ये वृद्धी करणारी होती. आम्हा साधकांमध्ये ‘सकारात्मकता आणि उत्साह वाढवणारी अन् साधनेचा ध्यास निर्माण करणारी’, अशी रूपरेषा प्रतिदिन होती.