माघ पौर्णिमेचा चंद्र पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती

‘आकाशात माघ पौर्णिमेचा चंद्र पहातांना मला चंद्राची कड आणि प्रभावळ लालसर दिसली. त्यात ‘ॐ’ स्पष्टपणे दिसला. ‘ॐ’मधून येणारा प्रकाश रामनाथी आश्रमावर पडत आहे’, असे मला दिसले.’

वर्ष २०२३ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सेवेनिमित्त जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘१६ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथ मंदिर, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला, त्यासंबंधी सेवा करतांना श्री. शिवप्रसाद कब्बुरे यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

साधकाच्या पोटात तीव्र वेदना होत असतांना त्याने अनुभवलेली सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सर्वज्ञता !

माझ्यासाठी नामजपादी उपाय शोधतांना मला होणार्‍या वेदना सद्गुरु काका स्वतः अनुभवत होते. नामजपादी उपाय आणि वेदनाशामक इंजेक्शन यांमुळे मला काही मिनिटानंतर हलके वाटू लागले. त्याच वेळी सद्गुरु काकांनाही हलके वाटले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका कार्यशाळेच्या वेळी कु. भारती माळीपाटील यांना आलेल्या अनुभूती

जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आल्या, तेव्हा त्यांना पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. डोळे उघडल्यावर त्या मला मुकुटधारी देवीसारख्या दिसल्या.

‘निर्विचार’, हा नामजप ऐकतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘निर्विचार’, या नामजपामुळे सौ. संगीता चव्हाण यांना अंतर्मनातील स्वभावदोष आणि अहं यांची केंद्रे पुसली जात असून अंतर्मनात पांढरा शुभ्र प्रकाश दिसत होता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मदिनी श्री. जितेंद्र राठी यांना आलेली अनुभूती 

मी मनाने गुरुदेवांच्या चरणांसमोर नमस्कार मुद्रेमध्ये बसलो होतो. तेथील सृष्टीने त्या वातावरणात जितकी फुले होती, ती सर्व फुले गुरुदेवांना अभिषेक म्हणून घालायला आरंभ केला. मीही त्या निसर्गरूपी अभिषेक सोहळ्यामध्ये हरवून गेलो.

सुकलेल्या जास्वंदीच्या रोपाला फुले आलेली बघून साधिकेच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया

देव सुकलेल्या रोपाला फुले देऊ शकतो, तर ‘देव माझ्या साधनेच्या प्रयत्नांची गती वाढवून मला साहाय्य करीलच’.अशी विचारप्रक्रिया होऊन मला श्री गुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

डॉ. दीपक जोशी यांनी गोवा येथे घेतलेल्या बिंदूदाबन शिबिराच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

‘ढवळी, फोंडा येथे २८, २९ आणि ३०.४.२०२३ या कालावधीत गोवा राज्यातील साधकांसाठी ‘बिंदूदाबन शिबिर’ घेण्यात आले. तेव्हा साधकांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

स्वतः देवीच्या रूपात असून धर्मविरोधकांशी लढत असल्याचे दृश्य दिसणे आणि त्यानंतर धर्मावरील आघाताची घटना प्रत्यक्षात घडल्याचे वृत्त समजणे

‘एप्रिल २०२३ मध्ये मला अकस्मात् पुढील दृश्य दिसले, ‘मला ८ हात आहेत. माझ्या सर्व हातांमध्ये शस्त्रे आहेत. समोरून मोठ्या संख्येने धर्मविरोधक येत आहेत. मी त्यांना न भीता सामोरी जात आहे. त्या वेळी माझे अस्तित्वच राहिले नव्हते. मला केवळ देवीमातेचेच अस्तित्व जाणवत होते.’

नागपूर येथील श्री. मु.वा. घुगल यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या चांगल्या अनुभूती !    

‘२३.३.२०२३ या दिवशी मला माझ्या कुटुंबासमवेत सनातनचे साधक यांच्या साहाय्याने आणि ईश्वर कृपेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याचा योग प्राप्त झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या चांगल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.