१. कुंडीतील जास्वंदीचे रोप सुकून गेल्यानंतरही त्याला दोन फुले येणे
‘आम्ही कोल्हापूरमध्ये रहात असलेल्या घरात कुंड्यांमध्ये काही रोपे लावली होती. एका कुंडीत जास्वंदीचे छोटेसे रोप लावले होते. कालांतराने त्या रोपाला असलेली सर्व पाने गळून पडली. काही दिवसांनी त्या रोपाला नवीन पालवी न फुटता अकस्मात् दोन कळ्या आल्या. त्यानंतर त्या जास्वंदीच्या कळ्या उमलून त्याला दोन फुले आली.
२. देव एखाद्या रोपाला पालवी नसतांनाही फुले देऊ शकतो, तर ‘तो प्रयत्नांची गती वाढवून साहाय्य करीलच’, अशी विचारप्रक्रिया होणे
काही प्रसंगांमुळे माझ्या मनाची स्थिती नकारात्मक झाली होती. व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून मला साधनेच्या प्रयत्नांची दिशा मिळाली; परंतु माझ्या मनात ‘हे सर्व कठीण असून नकारात्मक स्थिती सुधारायला वेळ लागेल’, असे विचार येत होते. नंतर या कुंडीत फूल आलेले पाहून मला पुष्कळ आनंद झाला. देव एखाद्या रोपाला पालवी नसतांनाही, म्हणजेच सुकलेल्या रोपाला फुले देऊ शकतो, तर ‘देव माझ्या साधनेच्या प्रयत्नांची गती वाढवून मला साहाय्य करीलच’, अशी विचारप्रक्रिया होऊ लागली. त्या वेळी मला श्री गुरूंप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्यानंतर नेहमी घडणार्या प्रसंगापेक्षा कितीही मोठा प्रसंग घडला, तरी त्यात माझ्या मनाची स्थिती स्थिर रहाण्यास साहाय्य होत होते. योग्य दिशा मिळाल्यामुळे प्रयत्न करण्यासाठी माझ्या अंतर्मुखतेत वाढ होत असल्याचे मला जाणवले.
‘ही सर्व केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचीच कृपा असून त्यांनीच ही अनुभूती दिली आणि माझे मन सकारात्मक केले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. माधुरी दुसे, कोल्हापूर (२२.११.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |