स्वतः देवीच्या रूपात असून धर्मविरोधकांशी लढत असल्याचे दृश्य दिसणे आणि त्यानंतर धर्मावरील आघाताची घटना प्रत्यक्षात घडल्याचे वृत्त समजणे

‘एप्रिल २०२३ मध्ये मला अकस्मात् पुढील दृश्य दिसले, ‘मला ८ हात आहेत. माझ्या सर्व हातांमध्ये शस्त्रे आहेत. समोरून मोठ्या संख्येने धर्मविरोधक येत आहेत. मी त्यांना न भीता सामोरी जात आहे. त्या वेळी माझे अस्तित्वच राहिले नव्हते. मला केवळ देवीमातेचेच अस्तित्व जाणवत होते.’

सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर

‘ते संपूर्ण दृश्य मी प्रत्यक्षात अनुभवले आहे’, असे मला वाटले. काही मिनिटे मी त्याच स्थितीत होते. त्या वेळी माझे मन अत्यंत आनंदी आणि उत्साही होते. थोड्या वेळाने मला समजले, ‘त्या दिवशी ३ गोरक्षकांवर ८०० धर्मांधांनी आक्रमण केले होते; परंतु आश्चर्याची गोष्ट, म्हणजे तिन्ही गोरक्षक धर्मांधांच्या क्षेत्रात निःशस्त्र असूनही सुखरूप वाचले होते. पोलिसांनी त्यांना सुरक्षितरित्या तेथून सोडवले होते. त्यांपैकी एक गोरक्षक ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वाचक आहेत.’

– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३९ वर्षे), जळगाव (४.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक