श्री जोतिबा देवाच्या मंदिराची चारही द्वारे खुली करण्यासाठी, तसेच ‘ई-पास’ बंद होण्यासाठी जोतिबा डोंगरावर बेमुदत आंदोलनास प्रारंभ !

श्री जोतिबा मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.

भारताने ‘स्वतंत्र तिबेट’ला मान्यता द्यावी ! – तिबेटचे नागरिक

तिबेटवर चीनने आक्रमण केल्यावर भारताने त्याच्या विरोधात आवाज उठवला नाही. त्यामुळे चीन उद्दाम झाला. आता तो भारतीय सीमेतही घुसखोरी करत आहे. त्यामुळे आतातरी भारताने आक्रमक भूमिका घेऊन तिबेटला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

तमिळनाडू सरकारने अवैध मशिदीवर कारवाई न केल्यास आंदोलन करणार ! – भारत हिंदु मुन्नानी

मूळात अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अवैध बाधकामांवर कारवाई का करत नाही ?

नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर भाजपच्या आमदारांचे आंदोलन !

देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर ९ मार्च या दिवशी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी समिती गठीत करून भूमी निश्चित करा !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी लवकरात लवकर समिती गठीत करून भूमी निश्चित करावी, या मागणीसाठी सांगली महापालिकेसमोर ७ मार्च या दिवशी भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

सावदा (जिल्हा जळगाव) येथील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर स्वस्तिक, तुळस आणि वारकरी यांची चित्रे रंगवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्लाघ्य प्रकार !

अन्य धर्मियांच्या पवित्र चिन्हांच्या संदर्भात असा प्रकार करण्याचे कुणाचे धाडस झाले असते का ?

युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे ! – पोप

युक्रेनवर युद्ध लादण्यात आले आहे. तेथे रक्त आणि अश्रू यांच्या नद्या वहात आहेत. हे युद्धच असून त्यात मृत्यू आणि विध्वंस होत आहे, असे प्रतिपादन ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी येथे केले.

आपण कितीही श्रीमंत असलो, तरी प्रत्येकाने मेट्रोतून प्रवास करण्याची सवय लावून घ्यावी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ६ मार्च या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या २ शहरांतील पिंपरी ते फुगेवाडी अन् गरवारे स्थानक ते आनंदनगर या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एम्.आय.टी. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेच्या वेळी ते बोलत होते.

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त मंदिरांवरील आघातांच्या विरोधात एकत्र येत आहेत. मंदिर विश्वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.’

एस्.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण अशक्य ! – ३ सदस्यीय समितीची शिफारस

अनिल परब यांनी ‘एस्.टी.’च्या सर्व कर्मचार्‍यांना कामावर परत येण्याचे आवाहन करून निलंबित करण्यात आलेल्या सर्व कर्मचार्‍यांना कामावर घेऊ, असे सांगितले.